। महाड । प्रतिनिधी ।
एका विवाहितेचे विवस्त्रावस्थेतील फोटो काढून, तिच्या नवर्याला ते पाठवून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देणार्या अज्ञात इसमाविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील वहूर येथे हा प्रकार घडला आहे.
या महिलेच्या पतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञात इसमाने या महिलेचे विवस्त्रावस्थेतील फोटो तिच्या नवर्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरुन पाठविले. त्याचबरोबर हे फोटो इंटरनेटवर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर फोनवर संपर्क साधून, या महिलेबद्दल आक्षेपार्ह विधाने केली.
महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे करीत आहेत.