। अलिबाग । वार्ताहर ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे राज्यस्तरिय एल्बोबॉक्सिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनारमध्ये धुळे, जळगाव, नाशिक,पुणे, नंदुरबार व रायगड येथून जवळजवळ 42 जणांनी सहभाग घेतला. या सेमिनारचे उद्घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंदार पनवेलकर यांनी केले. या सेमिनार मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंगचेसुरेश कोळी, सागर कोळी, संदीप माने यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक तसेच पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.