| पेण | प्रतिनिधी |
देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्यभूमी कोकण यात्रा सुरु करण्यात आली आहे. कोकणातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अभिवादन आणि कृतज्ञता अशा स्वरूपाची एक महत्वपूर्ण स्वराज्यभूमी कोकण यात्रा समृद्ध कोकण प्रदेश संघटनेच्या वतीने आणि ग्लोबल कोकणच्या वतीने सुरुवात करण्यात आली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावापासून ही यात्रा सुरू करण्यात आली. या यात्रेत सुमारे 200 देश प्रेमी कोकणवासीय नागरिक आणि युवक सहभागी झाले.
आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी यात्रेचे संयोजक, संजय यादवराव , संतोष ठाकूर, अॅड.मंगेश नेने, जे डी पाटील, राजेश्री यादवराव, प्रकाश चांदिवडे, समीर म्हात्रे निलेश म्हात्रे. संदीप पाटील,श्रीकांत देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. महामार्गाला स्वराज्य भूमी कोकण महामार्ग असे नाव द्यावे अशी प्रमुख मागणी या यात्रेच्या निमित्ताने करण्यात आली. मंदार जोग यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची माहिती यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना दिली.