स्वदेस फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाऊंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वदेस स्वप्नातील गावे बनवण्यात आलेली आहेत. यामधील उत्कृष्ट काम करणार्या 14 गावांचा तसेच स्वप्नातील गावांना घडवण्यासाठी मदत करणार्या स्वदेस फाऊंडेशनचा सन्मान रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते ना.ना. पाटील सभागृह अलिबाग येथे नुकताच करण्यात आला.
सुधागड तालुक्यामधील आपटवणे ग्रामपंचायत मधील भावशेत ठाकूरवाडी व तिवरे ग्रामपंचायत मधील कानसळ, श्रीवर्धन तालुक्यामधील वाळवटी ग्रामपंचायत मधील बौद्धवाडी व रोहिदासवाडी व नागलोली ग्रामपंचायत मधील नागलोली, म्हसळा तालुक्यामधील पाभरे ग्रामपंचायत मधील चाफेवाडी व खामगाव ग्रामपंचायत मधील खामगाववाडी, तळा तालुक्यामधील निगुडशेत ग्रामपंचायत मधील सोलमवाडी व सोनसडे ग्रामपंचायत मधील वावे हवेली, माणगाव तालुक्यामधील खरवली ग्रामपंचायत मधील चेरवली व वडगांव ग्रामपंचायत मधील वडघर, पोलादपूर तालुक्यामधील वझारवाडी ग्रामपंचायत मधील देऊळवाडी व गोळेगणी ग्रामपंचायत मधील येरूणकरवाडी,महाड तालुक्यामधील कुंभार्डे ग्रामपंचायत मधील गव्हाडी व लाडवली ग्रामपंचायत मधील बेटकरकोंड येथील गाव विकास समिती सदस्य,सरपंच व ग्रामसेवक तसेच स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने उपसंचालक तुषार इनामदार व महाव्यवस्थापक प्रसाद पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते सन्मान स्वीकारला.
सन्मानप्राप्त 14 गावांच्या गाव विकास समिती, सरपंच व ग्रामसेवक यांचे अभिनंदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी करून जिल्ह्यामध्ये अनेक स्वप्नातील गावे लवकरात लवकर तयार होतील अशी अशा व्यक्त केली तसेच स्वदेस फाउंडेशन रायगड जिल्ह्यामध्ये करीत असलेल्या ग्रामीण सक्षमीकरण कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन उप मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला व बालविकास उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, पाणी व स्वच्छता विभाग उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरखुटे, पशु संवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी ज्योस्तना शिंदे-पवार प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव, वित्त अधिकारी भगवान घाडगे,गटविकास अधिकारी विजय यादव, भाऊसाहेब पोळ व बालाजी पुरी उपस्थित होते यांच्या सह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी व स्वप्नातील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या नेहा जाधव यांनी केले. स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनीही सन्मानप्राप्त 14 गावांच्या गाव विकास समिती, सरपंच व ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले.