। मुंबई । वृत्तसंस्था |
शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून आज वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याची टीका करण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिलीच कधी? पेंग्विनसेना प्रमुखांनी याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्रात भ्रम पसरवण्याचं काम पेंग्विन सेनेच्या माध्यमातून होतंय, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यावर केलाय.
तसेच वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला म्हणताय तर याची चौकशी करा, अशी विनंती आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ‘ आता खोटं सहन केलं जाणार नाही. केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही म्हणून हिणवणं, यासाठी रान उठवणार असाल तर, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राला सत्य कळलंच पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे वेगळे, हे चालणार नाही. असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.