। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र गृह विभागाच्या पोलीस शिपाई संवर्गातील 20 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी पोलीस शिपाई संवर्गातील 2021 मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देण्यात आली असून एकूण वीस हजार पदे भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.