| अलिबाग | वार्ताहर |
महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने रविवारी लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तर्फे ऑक्टोबर सर्व्हिस लिंकचा शुभारंभ म्हणून अलिबाग समूद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली.
सकाळी 8 वाजता लायन्स क्लब ऑफ श्रीबागच्या अध्यक्षा अॅड. कला पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष संजय रावळे, विजय वनगे, बाबासाहेब चौगुले, श्रीकांत पाटील, सचिव संदीप वारगे, अॅड. अमित देशमुख, अॅड. भुपेंद्र पाटील, सौमिनी म्हात्रे यांनी जिल्हा न्यायालयाच्या मागील समूद्र किनार्यापासून सुरुवात करीत मुख्य किनार्यापर्यंत स्वच्छता केली. या मोहिमेसाठी त्यांना क्लबच्या फाऊंडर प्रेसिडेंट डॉ. निहा राऊत, चित्रलेखा पाटील, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शेवटी क्लबचे सचिव यांनी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने अल्पोपहार देऊन सर्वांचे आभार मानले