| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
रायगडचे दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे मुरुड जंजिरा एकदरा डोंगरापलीकडे समुद्रकाठी वसलेले शंकराचे पवित्र स्थान म्हणजे गोमुख समुद्रकिनारा विकासाच्या प्रतीक्षेत असून, या परिसराचे सुभोभिकरण झाल्यास ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते.
ध्यान धारणेसाठी उपयुक्त
येथील परिसर इतका सुंदर आहे की गोमुख समोर विशाल भव्य लाटा असलेला समुद्र, डाव्या बाजूस अभेद्य जंजिरा किल्ला. उजव्या बाजूस पदामदुर्ग किल्ला. काळ्या खडकात डोंगराच्या कपारीत वसलेल्ये हे गोमुख पर्यटकांना अतिशय आवडते ठिकाण आहे .शंकराचे जागरूक स्थान असल्याने महाराष्ट्रातून येथे अस्थी विसर्जनासाठी लोक येतात. सायंकाळी सूर्यास्तावेळी दगडावर बसून ध्यान धारणा करण्यासाठी अनेक भक्त रोज हजेरी लावतात.
खा. सुनील तटकरे यांनी एकदरा पूल ते गोमुख मार्गे खोरा बंदर रस्ता करून परिसराचे सुशोभीकर करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही. जर तो प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात झाला तर मुरुडला दाखवण्यासारखे एक पर्यटनस्थळ होईल. मुरुडला येणार प्रत्यक्ष पर्यटक खोरा बंदराला भेट देतो. त्यातूनच तो खोरा बंदरच्या मागील बाजूस जाऊन समुद्राच्या लाटांचा आनंद घेत गायमुखाचे दर्शन करेल आणि मुरुडच्या सुंदर समुद्रकिनारी उतरेल अशी संकल्पना तटकरे यांची होती. ती पूर्ण व्हावी, अशी मुरुडकरांची मागणी आहे.
गोमुखावर महाशिवरात्रीला सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी रांग लागते. सद्य भक्तांना एकदरा गावातून खराब रस्तावरुन चालत जावे लागते. सुशोभकारांचा प्रस्ताव झाला तर भक्त व पर्यटक आपली गाडी गोमुखावर घेऊन जाऊ शकतात व या निसर्गातील अजुबाचे दर्शन घेऊन शकतात.
गायमुखावर निसर्गाचा खराखुरा आनंद घेण्यासाठी आम्ही नेहमी जातो. सायंकाळी लालसर सूर्यप्रकाशात समुदाच्या लाटांना जोर असतो त्यावेळी समुद्राचे पाणी देखील सोनेरी होताना मी पाहिले आहे. इतके सुंदर पर्यटनस्थळ विकास का होत नाही? मी सांगीन पहिला अधिकृत रस्ता करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिकांना जाताना खूप त्रास होतो.
कोमल पारपट्टा, पर्यटक