| पनवेल । वार्ताहर ।
मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल आणि छपरादरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 05194 विशेष गाडी 2 नोव्हेंबरला पनवेल येथून रात्री 10.50 वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसर्या दिवशी सकाळी 8.50 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 05193 विशेष गाडी 1 नोव्हेंबर 2022 रोजी छपरा येथून दुपारी 3.20 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्या दिवशी रात्री 9 वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर आणि बलिया स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण रविवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.