डॉक्टरांचे काळजी घेण्याचे आवाहन
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यात सध्या डोळ्यांची साथ पसरली असून तालुक्यातील नागरिक डोळ्याच्या साथीने हैराण झाले आहेत. डोळ्यातून पाणी आणि कचरा येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसर्या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या व्याधीने त्रस्त रुग्णाचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, दिवसभरात 100 पैकी 3 ते 4 संसर्ग झालेले रुग्ण उपचारासाठी येत असून, रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
डोळे आल्यास डोळ्यांना हात लावू नये. डोळे सतत स्वच्छ पाण्याने धुवत राहा, शक्यतो प्रवास टाळावा, कुटुंबीयांपासून दूर राहा, डोळ्यांना हात लावू नये, वेगळा रुमाल वापरावा, तेलकट खाणं टाळावे हे उपाय करावेत.
डॉ. गजेंद्र मोधे
तळा प्राथमिक आरोग्य केंद्र