• Login
Tuesday, June 17, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

भारत जोडो यात्रेत रायगड मधून पाचशेहुन अधिक कार्यकर्ते सहभागी होतील: ऍड प्रवीण ठाकूर

Santosh Raul by Santosh Raul
November 1, 2022
in अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
भारत जोडो यात्रेत रायगड मधून पाचशेहुन अधिक कार्यकर्ते सहभागी होतील: ऍड प्रवीण ठाकूर
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यात्रेला विविध राजकीय  पक्षाचा पाठींबा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेड मध्ये येत आहे, या यात्रेसाठी रायगड मधून 500 हुन अधिक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस सचीव ऍड प्रवीण ठाकूर  यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष  राजाभाऊ ठाकूर, वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर  महिला  काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष ऍड श्रद्धा ठाकूर, मानवाधिकार समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष सौ. कविता ठाकूर उपस्थित होत्या. ही यात्रा केवळ राजकीय उद्देशाने नव्हे तर सर्वाना एकत्र आणण्यासाठी सुरू असल्याने विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याचे प्रवीण ठाकूर  म्हणाले.

भारत जोडो यात्रेसाठी रायगडची जबाबदारी समन्वयक म्हणून ऍड प्रवीण ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या यात्रेच्या नियोजनासाठी मंगळवारी अलिबागेतील बॅ. ए. अंतुले काँग्रेस भुवन येथे पक्षाच्या  पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकितील नियोजनसंदर्भात माहिती देताना ऍड प्रवीण ठाकूर म्हणाले की, एकीकडे भारत तोडे चे प्रयत्न होत असताना खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करून भारत जोडण्याची, सर्वाना एकत्र आणण्याची जी भूमिका घेतली आहे, त्याला देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार , यांच्या सह इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचा देखील  पाठींबा मिळत आहे. शेकापचा देखील पाठींबा असल्याची माहिती ऍड. ठाकुर यांनी दिली.

खा. राहुल गांधी हे आता पर्यंत 1200 किमी चालले आहेत. 3600 किमी चा प्रवास आहे. त्यांच्या अभियानाचे कौतुक करताना, ही यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे येईल त्यात रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. त्या नंतर 19 नोव्हेंबर ला बुलढाणा, शेगाव  या प्रवासात देखील रायगड मधून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यात्रेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाते. असे त्यानी सांगितले.

माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या समरणार्थ ठाकूर कुटुंबियांकडून  लाखाचे अर्थसहाय्य
भारत जोडो यात्रे साठी रायगड मधून जे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत त्यांच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस सचिव ऍड प्रवीण ठाकूर यांच्यावर आहे. दरम्यान या यात्रे साठी ऍड प्रवीण ठाकूर आणि राजाभाऊ ठाकूर यांच्या पुढाकाराने आज आगाऊ रक्कम म्हणून रोखीने 1 लाख रुपये पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या समरणार्थ हा निधी देण्यात आला असून आणखी येणारा खर्च देखील करण्याची तयारी असल्याचे राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितले. या वेळी ऍड प्रवीण ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, अलिबाग तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अलिबाग तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष योगेश मगर आदी उपस्थित होते.

Related

Tags: alibagcongresskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspravin thakurraigad
Previous Post

महाड तालुक्यातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास

Next Post

समान नागरी कायदा 

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ
उरण

रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ

June 17, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
पनवेल

धोकादायक पर्यटनावर पोलिसांची बंदी

June 17, 2025
आईकडे जाते सांगून निघालेली विवाहित महिला बेपत्ता
sliderhome

आईकडे जाते सांगून निघालेली विवाहित महिला बेपत्ता

June 17, 2025
दि.बा.पाटील व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची दुरवस्था!
पनवेल

दि.बा.पाटील व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची दुरवस्था!

June 17, 2025
रोह्यामधून विवाहितेसह दोन मुले बेपत्ता
sliderhome

रोह्यामधून विवाहितेसह दोन मुले बेपत्ता

June 17, 2025
मुंबई- पुणे महामार्गावर विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू
sliderhome

मुंबई- पुणे महामार्गावर विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू

June 17, 2025
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

समान नागरी कायदा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+28°
Alibag
Tuesday, 17
Wednesday
+29° +27°
Thursday
+29° +26°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.