। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नागाव-पाल्हे येथे दरवर्षी प्रमाणे कार्तिक एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाईचा उत्सव शुक्रवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी दहा वाजता स्पर्धेस शुभारंभ होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेकापचे जिल्हा चिटणाीस अॅड. आस्वाद पाटील, नागावचे सरपंच निखिल मयेकर, उपसरपंच रसिका प्रधान, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, जि.प. माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, नागाव ग्रा.पं. सदस्य हर्षदा मयेकर, सुरेंद्र नागलेकर, माजी सदस्य राजेंद्र मयेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ व वनदेव क्रीडा मंडळ, जय भवानी मित्र मंडळ आणि सुशांती महिला मंडळ, पाल्हे मेहनत घेत आहेत. तरी पंचक्रोशितील कबड्डीप्रेमींनी या स्पर्धेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भजनांचा कार्यक्रम
अलिबाग तालुक्यातील नागाव-पाल्हे येथे कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाईचा उत्सव पार पडणार आहे. त्यानिमित्त रात्री सात वाजता पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री दहा वाजता संगीत भजनांचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, जय हनुमान प्रासादित भजन मंडळ, गडब-पेण, स्व. केशवररावबुवा पाटील यांचे शिष्य बुवा महेंद्र पाटील यांना पखवाजवादक म्हणून सुभाष तांडेल, तर तबलावादक म्हणून दिपेश पाटील साथ देणार आहेत. तर, श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ, डिकसळ-कर्जत, गजाननबुवा पाटील यांचे शिष्य कैलासबुवा पाटील यांना पखवाजवादक म्हणून छगनबुवा निमणे, तर तबलावादक म्हणून प्रणित निमणे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ व वनदेव क्रीडा मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, पाल्हे मेहनत घेत आहेत. तरी, भजनप्रेमींना भजनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.