। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गटाचा गुवाहाटी दौरा निश्चित झाला आहे. सर्व आमदार आणि खासदार कुटुंबासह 26 नोव्हेंबरला संध्याकाळी गुवाहाटीला जाणार आहेत. 27 नोव्हेंबरला सकाळी सर्वजण प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.
यासाठी एअर इंडियाचे 180 जणांसाठी विमान बूक करण्यात आले आहे. या दौर्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुुरु आहे. या दौर्यात शिंदे हे आसामचे मुख्यंमत्री, पोलीस महासंचालक आदींची भेट घेऊन आभार व्यक्त करणार आहेत.