मुंबई | प्रतिनिधी |
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना प्रकृती बिघडल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अचानक अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली होती. गुरुवारी त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती आहे. या चाचणीमध्ये कोणताही दोष आढळलेला नाही. यामुळे ऑपरेशन करण्याची आवश्यकता नसल्याचेही समजत आहे. लवकरच जयंत पाटील कामावर रुजू होणार आहेत. स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली.