। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खोपोली मधील मिल गाव, ठाकूरवाडी परिसरातील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडले असून डोक्यात दगड घालून अज्ञात आरोपीने तिची हत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.
मयत महिलेचे वर्णन खालील प्रमाणे अनोळखी महिला वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष, अंगात लाल रंगाचे स्वेटर व लाल रंगाची साडी परिधान केलेली, गळ्यात काळ्या व पांढऱ्या रंगाचा स्कार्फ, हातात हिरव्या रंगाच्या तसेच पिवळ्या धातूच्या बांगड्या, कानात पिवळ्या रंगाचे झुमके, पायात पैजण तसेच पायाच्या बोटात जोडवी. उजव्या हातामध्ये तसेच उजव्या पायामध्ये काळा गंडा दोरा असे मृत महिलेचे वर्णन आहे.
सादर घटनेचा खोपोली पोलीस तपास करीत आहेत तरी सदर महिलेबाबत कोणास काही माहिती मिळून आल्यास खोपोली पोलीस स्टेशनची संपर्क करावा अशी विनंती पोलिसांमार्फत करण्यात अली आहे.