| चिपळूण | प्रतिनिधी |
सह्याद्री रॅन्डोनियर चिपळूण क्लब तर्फे (दि.17) 600 किलोमीटर अंतराची बीआरएम ही स्पर्धा (इव्हेंट) आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा पाटण-कराड-बेळगाव-हुबळी पुन्हा बेळगाव-कराड -पाटण या नियोजित मार्गांवर आयोजित करण्यात आली होती. डॉ. समुद्रविजय पाटील, डॉ. तेजानंद गणपत्ये, अहमद शेख, योगेश ओसवाल, रोहन पवार या पाच सायकलपटूनी हा बीआरएम किताब अथक मेहनतीने पूर्ण केला.
रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग अशा विविध शहरातून जवळपास दहा स्पर्धेकांनी भाग घेतला होता. यासाठी सर्वांना 40 तासांचा कालावधी देण्यात आला होता. हे सहाशे किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दिलेल्या वेळेच्या आत सर्वच्या सर्व दहा स्पर्धेकांनी चाळीस तासाच्या आत यशस्वी पुर्ण केले. कोणतीही सराव नसताना केवळ इच्छाशक्तीच्या व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा केवळ यशस्वी न करता एसआर किताब पटकविणारे चिपळुणमधील प्रसिध्द ओसवाल मोबाईल शॉपीचे योगेश ओसवाल हे आकर्षणाचा विषय ठरले. याबद्दल त्यांचे ज्येष्ठ बंधू संदीप ओसवाल यांनी सर्व स्पर्धकांचे पुष्पवृष्टी करून तसेच पेढे वाटून सर्वांचे स्वागत केले.
चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे डॉ. समुद्रविजय पाटील, डॉ. तेजानंद गणपत्ये, अहमद शेख, योगेश ओसवाल, रोहन पवार या पाच स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. या पाचही जणांनी स्पर्धा वेळेत पुर्ण केली. ज्यामध्ये डॉ. समुद्रविजय पाटील, अहमद शेख, योगेश ओसवाल या तीन सायकलपट्टूनी सायकलिंग क्षेत्रात मानाचा समजणारा एसआर हा किताब पटकवला आहे.
गेल्या दोन वर्षात चिपळूण सायकलिंग तर्फे हा मानाचा समजणारा एसआर हा किताब आतापर्यंत दहा जणांनी पटकाविला आहे. आगामी दिवसात डॉ. तेजानंद गणपत्ये, रोहन पवार हे दोघे या किताबासाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे क्लबच्या नावलौकिकात भर पडणार आहे.