| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या तर रविवारी 6 ग्रामपंचायतीमध्ये आणि सदस्यांमध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये घोणसे ग्रामपंचायत हि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असताना त्यामध्ये रमेश काणसे विजयी झाले आहेत. तर तोंडसुरे ग्रामपंचायतमध्ये शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली असता त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निसटता पराभव झाला आहे.
तर त्याठिकाणी राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर देवघर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा वर्चस्व असलेली ग्रामपंचायत आपल्या गाव विकास आघाडीने घेतली आहे. तर त्याठिकाणी शेकाप पक्षाला अल्प मताने पराभव स्वीकारावा लागला. तर संदेरी तोराडी लेप या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच बहुमताने निवडून आले आहेत. तर बिनविरोध ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कडे काळसुरी, रेवली, कणघर, फळसप तर कांदळवाडा शिवसेना ठाकरे गटाकडे निगडी, देवघर व खरसई ग्रामविकास आघाडी असल्याने तालुक्यात एकूण राष्ट्रवादीला 10 ग्रामपंचायतीमध्ये यश संपादित करता आला आहे.