। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी शनिवारी अलिबाग मध्ये डोळ्यावर काळा रुमाल बांधून मोटार सायकल चालवली. ते पाहण्यासाठी अलिबागकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेक अडथळे निर्माण करण्यात आले होते, ते पार करत जितेंद्र यांनी कोणत्याही अडथळ्याविना हि मोटार सायकल सुखरूप चालवली.







