• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

केवळ अविस्मरणीय

Varsha Mehata by Varsha Mehata
December 27, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अजित भिडे

यंदाचा फिफा विश्‍वचषक अनेकार्थाने वेगळा होता. प्रथमच मध्यपूर्व देशामध्ये ही स्पर्धा होत होती. खेरीज एरवी उन्हाळ्यात आयोजित होणारे हे सामने प्रथमच हिवाळ्यात होत होते आणि प्रचंड प्रेक्षकवर्ग असणारे दोन दिग्गज आपला शेवटचा फिफा विश्‍वचषक खेळत होते. मात्र त्यांच्याबरोबर यंदा नवीन खेळाडूदेखील चमकून गेले. त्यामुळे कतारमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या तोंडी मेस्सीबरोबरच रामोस, एम्बाप्पेचेही कौतुक होते.

फिफा विश्‍वचषकाचे सूप वाजले आणि लिओनेल मेस्सीच्या नावाचा जयघोष करत आम्ही स्टेडिअमच्या बाहेर पडलो तेव्हा एक अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन जात असल्याचे विलक्षण समाधान होते. याआधीच्या म्हणजेच पोर्तुगाल-घाना आणि जपान-जर्मनीमधील सामने मी पाहिले होते. त्यामध्ये आणि अखेरच्या सामन्यातला फरक असा की, आधीच्या स्पर्धांमध्ये त्या त्या देशांच्या नागरिकांचे प्रमाण जास्त होते. ते आपल्या खेळाडूंना पाठिंबा देत होते. पण शेवटच्या स्पर्धेत मात्र मेस्सीच हिरो असल्यामुळे मैदानावर सर्व दिशांनी त्याच्याच नावाचा जल्लोश सुरू होता. थोडक्यात, अर्जेंटिनाच ही अंतिम स्पर्धा जिंकणार, असा माहोल आधीपासूनच तयार झाला होता. बरेचजण अर्जेंटिनाची जर्सी घालून आले होते. त्यामुळे मैदानावर निळाई अवतरल्याचा भास होत होता. त्या दिवशीची मॅच सुरू झाली, अर्जेंटिनाने दोन गोल केले आणि 67 मिनिटांपर्यंत ही मॅच एकतर्फी असल्यासारखे वाटत होते. तोपर्यंत फ्रान्सचा स्कोअर शून्य होता. पण त्या संघाने 67 व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि पुढच्या पाच-सात मिनिटांमध्ये दुसराही गोल केला तेव्हा मात्र खरी चुरस सुरू झाली. याचे कारण यंदाचे फिफाचे वैशिष्ट्यच होते की, 90 मिनिटे संपल्यानंतर तीस मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत पुन्हा सामन्याचे चित्र बदलताना दिसले होते. याच वेळेत सगळे निकाल बदलले होते. त्यामुळे आधी अर्जेंटिनाच्या विजयाबद्दल खात्री असणारे सगळेच चिंतेत पडले होते. अनेकजण डोक्याला हात लावून बसले होते. तीन-तीन अशी बरोबरी साधत 90 मिनिटे संपल्यानंतर पेनल्टी शूटआऊटसाठी 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला गेला. त्यात 4-2 ने अर्जेंटिनाचा विजय झाला आणि जल्लोशाने आसमंत दणाणून गेला. त्याचे वर्णन शब्दात करता येणे केवळ अशक्य आहे.
यंदाचा फिफा विश्‍वचषक अनेकार्थाने वेगळा होता. प्रथमच मध्यपूर्व देशामध्ये ही स्पर्धा होत होती. खेरीज एरवी उन्हाळ्यात आयोजित होणारे हे सामने प्रथमच हिवाळ्यात होत होते आणि प्रचंड प्रेक्षकवर्ग असणारे दोन दिग्गज आपला शेवटचा फिफा विश्‍वचषक खेळत होते. मात्र त्यांच्याबरोबर यंदा नवीन खेळाडूदेखील चमकून गेले. त्यामुळे कतारमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या तोंडी मेस्सीबरोबरच रामोस, एम्बाप्पेचेही कौतुक ऐकायला मिळत होते. अंतिम स्पर्धेच्या दिवशी कतारचा राष्ट्रीय दिनदेखील होता. त्यामुळे सगळीकडेच प्रचंड गर्दी होती. या देशाने स्टेडिअमवर पोहोचण्यासाठी मेट्रो आणि बससेवा विनाशुल्क ठेवली होती. पण राष्ट्रीय दिवस असल्यामुळे स्थानिकदेखील बाहेर पडले होते. असे असूनही त्यांनी आदर्श नियोजनाचा वस्तुपाठ दाखवला. दोन तासांसाठी मेट्रोचे सगळे रुट बंद केले गेले आणि फक्त स्टेडिअमकडील रुट सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रवास सुकर झाला. एकूणच पूर्ण स्पर्धेदरम्यान कोणाची कोणतीही गैरसोय झाली नाही. रस्ता सांगायला ठिकठिकाणी स्वयंसेवक तैनात होते. अंतिम मॅचच्या दिवशी तर दुपारी साडेचार वाजल्यापासून राजाच्या हस्ते पुरस्कार देण्यापर्यंतचा सगळा सोहळा अविस्मरणीयच होता.
कतारसारख्या देशात फिफाचे आयोजन चर्चेची राळ उडवणारे ठरले होते. ऐन वेळी बडवायजरने अल्कोहोलविरहीत पेय बाजारात आणले. खरं तर फिफा आणि अल्कोहोल हे समीकरण झाल्यासारखी स्थिती होती. त्यामुळेच कतारच्या प्रशासनाने ‘स्टेडियमवर लिकर मिळणार नाही’ म्हटल्यावर बरेच लोक नाराज झाले होते. मग हे लोक मजा करण्यासाठी दुबईला जायचे आणि मॅच बघायला तिथून विमानाने कतारला परत यायचे. अगदी शेवटच्या दिवशी काही प्रमाणात लिकर सर्व्ह केली गेली, पण सरसकट परवानगी नव्हतीच. दुसरा भाग म्हणजे भारतीय माणूस अंग झाकणारे कपडे घालतो, मात्र युरोपियन लोकांनी त्यांच्या पद्धतीनेच कपडे घालते होते. अर्थात कतारनं त्यावर आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. अर्जेंटिनाला पाठिंबा देताना अनेकांनी टी शर्टच काढून टाकले होते, पण हे सगळे कतारतर्फे खिलाडूवृत्तीने घेतले गेले. मॅचेसबरोबरच अनेकांनी कतारच्या संस्कृतीचा, या देशातल्या प्रेक्षणिक स्थळांना भेटी देण्याचाही आनंद लुटला. तिथले मॉल पाहिले. तिथे सुक वाकिब नावाचा भाग आहे. ही जुनी बाजारपेठ असून त्यात मसाल्याचे पदार्थ, खजूर, केशर आदी घटक मिळतात. हा भाग वगळता कतारच्या सगळ्या भागात विलक्षण चकचकाट दिसतो. नव्या-जुन्यातील फरक बघण्याचा अनुभवही छान होता.
अर्थात हे सगळे असले तरी यंदाच्या फिफामध्ये खरी चर्चा रंगली ती मेस्सीची… वयाच्या अकराव्या वर्षी ‘ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी’ (जीएचडी) शी झुंज देण्यापासून जगातील महान फुटबॉलपटू बनण्यापर्यंतचा मेस्सीचा प्रवास ही उत्कटता, जिद्द आणि चिकाटीची अनोखी कहाणी आहे आणि अंतिम फेरीत त्याने विजेतेपद पटकावले. तो एक जिवंत आख्यायिका बनला आहे. आता मॅराडोना आणि मेस्सी यांच्यात श्रेष्ठ कोण, या चर्चेलाही पूर्णविराम मिळणार आहे. सात वेळा बॅलन डी’ओर, सहा वेळा युरोपीयन ‘गोल्डन शूज’चा विक्रम, बार्सिलोनासोबत विक्रमी 35 जेतेपदे, ला लीगमध्ये 474 गोल, एका क्लबसाठी (बार्सिलोना) 672 गोल… गणती करावी तेवढी थोडी! मेस्सीला विश्‍वचषक न जिंकण्याचे दुखणे नेहमीच वाटत होते. ही त्याची शेवटची संधी होती. 23 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करण्याआधी त्याने बहुधा त्याच वचनाची आंधळेपणाने पुनरावृत्ती केली होती. 1986 मध्ये अर्जेंटिनाने शेवटचा विश्‍वचषक जिंकला, तेव्हा मॅराडोना देशासाठी देव बनला. तेव्हा त्याने अंतिम फेरीत गोल केला नव्हता. विश्‍वचषक न जिंकल्यामुळे मेस्सीच्या महानतेवर वारंवार बोटं उचलली जात होती. 2014 च्या विश्‍वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जेंटिनाचा एका गोलने पराभव केल्यावरही त्याच्या क्षमतेपुढे प्रश्‍न उपस्थित केले गेले होते. या विश्‍वचषकाच्या पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाने मेस्सीच्या संघावर अनपेक्षित विजय नोंदवला, तेव्हाही प्रश्‍न निर्माण झाले. जणू तो पराभव अर्जेंटिना आणि मेस्सीसाठी जीवनदायी ठरला.
पराभवाच्या दु:खात मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांना जगाने अनेक वेळा अश्रू ढाळताना पाहिले; मात्र रविवारी मेस्सीच्या चेहर्‍यावरील दिलासा आणि निवांत हास्याने सर्व चाहत्यांना अविस्मरणीय आनंद दिला. मेस्सीच्या नशिबात ही रात्र अनेक अमावस्यांनंतर आली. 2014 च्या विश्‍वचषक स्पर्धेमध्येही अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मेस्सी जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर होता. मात्र जर्मनीने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून विश्‍वचषक जिंकला. त्या सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे तो खूप भावूक झाला. 2016 मध्ये अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची संधी होती. समोर चिलीचा संघ होता. हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आणि तिथे अर्जेंटिनाचा पराभव झाला. शूटआऊटमध्ये मेस्सीचा गोल हुकला. गोलपोस्टला धरून बराच वेळ रडत राहिलेल्या मेस्सीचे ते चित्र क्वचितच कोणी विसरले असेल.
2018 च्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सने अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला आणि मेस्सीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. ही रात्रही मेस्सीसाठी अश्रू घेऊन आली. प्रत्येक पराभवावर चाहते मेस्सीला भावूक होताना बघत होते. आज संपूर्ण अर्जेंटिना संघ रडत होता. प्रत्येक चाहत्याचे डोळे ओले होते आणि मेस्सी हसत होता, कारण अश्रूंची फुले झाली होती! त्याच्या जिद्दीची ही कहाणी अवघ्या जगासाठी प्रेरणादायी आहे. हा क्षण आमच्यासारख्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय होता. अंतिम फेरीतल्या या सामन्याचे गारुड चाहत्यांच्या नजरेसमोरुन जाणार नाही. आयुष्यभर तो दिवस, तो प्रसंग आठवणीमध्ये राहील.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

ठरावाचे राजकारण

Next Post

आगरसूरे फाट्यावर महिलेला एसटीने चिरडले; नुकसान भरपाईसाठी शेकापची मागणी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

आगरसूरे फाट्यावर महिलेला एसटीने चिरडले; नुकसान भरपाईसाठी शेकापची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?