| पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कळंबोली वसाहतीत हेवेतील प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. काहीच आठवड्या पूर्वी कळंबोली वसाहतीमधील हवेची गुणवंत्ता सर्वात खराब असल्याची आकडेवारी या यंत्रणेद्वारे नोंदवण्यात आली आहे. आता मात्र अचानक कळंबोली वसाहतीमधील हवेची गुणवंत्ता सर्वात चांगली असल्याची आकडेवारी यंत्रणा दर्शवत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या प्रयत्नामुळे हा चमत्कार झाला आहे, कि एमपीसीबीची ही यंत्रणाच सदोष असल्याने हवेच्या गुणवंत्तेत सुधारणा दर्शवली जात आहे ,असा सवाल उपस्थित होत आहे.
पनवेल पालिका हद्दीतील जवळपास सर्वच प्रभागात प्रदूषणाचा मुद्दा गंभीर आहे. प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने नागरिकांची प्रदूषणातून मुक्तता करण्यासाठी एमपीसीबी ने प्रयत्न करावेत अशी मागणी सातत्याने खेली जात होती. नागरिकांकडून केल्या जाणार्या मागणीची दखल घेत एमपीसीबीने कळंबोली वसाहतीत हेवेतील प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा बसवली आहे. जवळपास 50 लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या या यंत्रने द्वारे हवेतुन होणार्या प्रदूषणावर लक्ष ठेवले जात असून, हवेत कोणत्या प्रकारच्या प्रदूषणाचे घटक जास्त प्रमाणात आहेत याची नोंद केली जाते. जेणे करून हे प्रदूषण कोणत्या कारखान्यातून होते याचा शोध घेणे शक्य होते. कळंबोली वसाहतीत बसवण्यात आलेल्या या यंत्रनेत काही दिवसा पूर्वी हवेच्या गुणवंत्ते निर्देशांक सर्वात खराब म्हणजेच 353 इतका असल्याचे दर्शवण्यात आले होते. आत हा निर्देशांक 60 च्या आत म्हणजे सर्वात चांगल असल्याचे दर्शवले जात आहे.