मनोहर भोईर यांचे प्रतिपादन
| उरण | वार्ताहर |
गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. अशा आदर्शवत सरपंच सुचिता ठाकूर यांचा आदर्श प्रत्येक गाव परिसरातील सरपंचानी अंगीकारणे गरजेचे आहे.असे मत मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केले आहे.
सरपंच सुचिता ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुतूम गावातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी ( दि21) केले होते. यावेळी भोईर हे बोलत होते.काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करतांना व सरपंच सुचिता ठाकूर यांना शुभेच्छा देताना सांगितले की धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्तांनी देशाच्या उन्नती साधण्यासाठी त्याग केला आहे. अशा प्रकल्पग्रस्तांच्या बेरोजगार तरुण – तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी आज धुतूम ग्रामपंचायत हद्दीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रकल्पग्रस्तांच्या दुष्टीने अभिमानाची बाब आहे.अशा रोजगार मेळाव्यातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल यात तीळमात्र शंका नाही, असे ते म्हणाले.
यावेळी मिलिंद पाडगांवकर, विनोद म्हात्रे, रेखा पाटील, डॉ मनिष पाटील, संतोष ठाकूर, कमळाकर पाटील, पी.जी.ठाकूर, नारायणशेठ ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, सदस्य प्रेमनाथ ठाकूर,प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, रविनाथ ठाकूर, सुचिता कडू, स्मिता ठाकूर, अनिता ठाकूर,कमळाकर पाटील, काँग्रेस गाव अध्यक्ष शंकर ठाकूर, माजी सरपंच अमुत ठाकूर, रामनाथ ठाकूर, कुष्णा ठाकूर, शंकर ठाकूर आदी उपस्थित होते.