| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 9 लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
कळंबोली, सेक्टर- 4 ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहात असून, सचिन सूळ आणि त्यांची पत्नी राजश्री सुळ दोघेही कामाला आहेत. सचिन सुळ नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. तर राजश्री या आपल्या मुलाला क्लासमध्ये तर मुलीला शाळेत सोडून कामावर गेल्या होत्या. यादरम्यान त्यांचे घर बंद असल्याने चोरट्याने संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 9 लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.