। कोलाड । वार्ताहर ।
क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीयस्तरावर कार्यरत असलेल्या व मिक्स बॉक्सिंगमध्ये चांगले खेळाडू घडवणार्या इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी, जनरल सेक्रेटरी राकेश म्हसकर यांनी सुरेश मगर यांची निवड केली आहे.
भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशन ही नामांकित संस्था असून अध्यक्षपदी सुरेश मगर यांची निवड झाल्यामुळे मिक्स बॉक्सिंग या खेळातील खेळाडूंना व ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणार्या स्पर्धेला मदत होणार आहे. सुरेश मगर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे लालताप्रसाद कुशवाह, संतोष खटावकर, काशिनाथ धाटावकर, राकेश म्हसकर, अनंत थिटे, सचिन कदम, लक्ष्मण मोरे, नवनीत डोलकर, शशीकांत कडू, अरविंद मगर, डॉ. सागर सानप, डॉ. मंगेश सानप, डॉ. माधव आग्री आदींसह विविध स्तरावरील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.