। अलिबाग । प्रतिनिधी ।
कृषीवल हळदीकुंकू सोहळा खालापूर येथे श्रीकृष्ण पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि.28) संपन्न होणार असून या कार्यक्रमात आपल्या लावणीने रायगडकरांच्या मनावर राज्य करणार्या सोनाली पवारचा लाईव्ह परफॉर्मन्स तुम्हाला पाहता येणार आहे. कृषीवलच्या इंन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला सोनालीचा नवा कोरा नृत्यविष्कार येणार आहे. सोनाली पवार हिने कधीही सादर न केलेली लावणी पाहण्याची संधी तुम्हाला यानिमित्ताने मिळणार आहे. सोनालीमुळे या कार्यक्रमात लोककलेचे सुर घुमणार आहे. महिलांच्या मनोरंजनासाठी सोनाली अस्सल लावणी सादर करणार आहे.
सोनालीने यापुर्वीच सादर केलेल्या लावणीच्या अनेक दिलखेचक अदा पाहून रायगडकर घायाळ झालेत. त्यामुळे तिची ही अदा घरबसल्या पाहण्यासाठी इंन्स्टाग्राम पेजला भेट द्या आणि सोनालीच्या ठसकेबाज लावणीचा आस्वाद घ्या.