। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील लाडवली गावात निसर्गाच्या चमत्कार प्राणीच्या रूपाने पाहवयास अनुभवास मिळत आहे लाडवली गावात राहणारे सिध्देश संतोष शिंदे यांचा कोंबडीने ४ पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. ऐकावं ते नवलच वाटावे असले कोंबडीचे पिल्लू जन्माला आले चार पायाचे कोंबडीचे पिल्लू, घरातील एका कोंबडीने उबवलेल्या अंड्यात एक चार पायांच्या कोंबडीचा जन्म झाला आहे.
हे कोंबडीचे पिल्लू पाहून तिचा मालकही अवाक झाला आहे. अशा आगळ्या वेगळ्या प्रकारच्याही कोंबडीच्या पिल्लाला पाहायला बघ्यांची गर्दी जमत आहे, दरम्यान या कोंबडीची चर्चा संपूर्ण गावात रंगली आहे. ही कोंबडी सर्वसामान्य कोंबडी पेक्षा अतिशय वेगळी आहे. सर्वसामान्य कोंबडीप्रमाणे या पिल्लाला दोन पंख, दोन डोळे, आणि चोच आहे पण नवल म्हणजे या कोंबडीच्या पिल्लाला चक्क चार पाय आहेत. यातील पुढे दोन पाय आणि मागच्या बाजूला आहेत. अशाप्रकारच्या काही क्वचितच घटना घडतात.