। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव एज्युकेशन ट्रस्टच्या पुढाकारातून शनिवार, दि.28 जानेवारी रोजी एस.एस.निकम इंग्लिश स्कुल लोणेरे येथे माइंडसेट फॉर एज्युकेटर्स या विषयाचे प्रशिक्षण माणगाव प्रा. संगीता कोकाटे यांनी दिले. प्रशिक्षणाची सुरुवात सरस्वतीपूजनाने करण्यात आली. लोणेरे शाखेच्या प्रा. दर्शना चावरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर संगीता कोकाटे यांनी माइंडसेट फॉर एज्युकेटर्स या विषयावर आधारित मार्गदर्शन केले. यात माइंडसेटचे ग्रोथ माइंडसेट अँड फिक्स माइंडसेट असे दोन प्रकार असतात व त्याचा विद्यार्थ्यांना शिकवताना कसा वापर करून याबद्दल उद्धृत केले.
तसेच वर्गात विद्यार्थ्यांना उद्युक्त करण्यासाठी कोणकोणत्या क्लृप्त्या, संकल्पना वापरण्यात आल्या याबद्दल विशेष माहिती दिली. या प्रशिक्षणात शिक्षकांना वेगवेगळे उपक्रम देऊन तसेच पीपीटीद्वारे हे प्रशिक्षण अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले गेले. प्रशिक्षणासाठी सर्व शाखेचे प्राचार्या, मुख्याध्यापक, को-ओर्डीनेटर तर साधारणतः 75 शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रशिक्षणाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.