विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
| वावोशी | वार्ताहर |
वावोशी येथील पीएनपी इंग्लिश मिडीयम शाळेत विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा आनंदमेळावा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला तब्बल 700 पेक्षा अधिक महिला व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला उद्योजिका प्रिया कोलारा व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सारिका धोत्रे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पीएनपी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी यांनी दिवसेंदिवस शाळेची प्रगती कशी वाढत आहे याची माहिती वार्षिक अहवालाद्वारे उपस्थितांना दिली. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या आनंदमेळावा या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी तसेच पालकांनी विविध खाद्यपदार्थांची जसे पुरणपोळी, मोदक, मिसळपाव, गुलाबजाम, बासुंदी, सँडविच, कचोरी, दाबेली, बिर्याणी, कांदाभजी, पावभाजी, चंपाकळी, चहा, ढोकळा, पाणीपुरी, भेळ, पिझ्झा, नूडल्स, समोसा अशा विविध खमंग व स्वादिष्ट खाद्यपदार्थांची दुकाने मांडली होती. कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांनी या खाद्यपदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेतला. तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे आयोजनदेखील केले होते.
यावेळी शाळेतील शिक्षिकांनी व विद्यार्थिनींनी हळदीकुंकू साजेसे सुंदर नृत्य सादर केले. यावेळी जवळजवळ 1000 ते 1200 लोक उपस्थित होते. अशा या आनंदी आणि मनमोहक वातावरणात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या एकत्रित सहभागाने आनंदमेळावा आणि हळदीकुंकू समारंभ मोठ्या आनंदमय वातावरणात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये छत्तीशी विभागामधील अनेक प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभले. वावोशी सरपंच अश्विनी शहासने, उपसरपंच दिपाली शिर्के, आपटी ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना मोरे, श्वेता मनवे, गोरठण ग्रामपंचायत सदस्या वर्षा झेमसे, आरती पाटील, पूजा पाटील, होराळे ग्रामपंचायत सदस्या सुरेखा दळवी, सुप्रिया मरागजे, अर्चना पाटील, वृषाली शिर्के, पूनम मरागजे, महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती महिला सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष रंजना पाटील, माजी सरपंच गिरीधर पिंगळे गुरुजी, पाटील विद्याधर पाटील, वडवळचे माजी सरपंच अनिल मरागजे तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील, अनंत पाटील, शेट्ये गुरुजी, बँक मॅनेजर राजेंद्र पाटील, शिरवलीचे तंटामुक्ती अध्यक्ष विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन विचारसरणी, अत्याधुनिक विचार रुजवून प्रात्यक्षिक व व्यवहारज्ञान देत एकंदरीतच अशा विविध उपक्रमांद्वारे पालक वर्ग आकर्षित होऊन शाळेची प्रगती होताना लक्षात येते. – मानसी पाटील, मुख्याध्यापिका, पीएनपी इंग्लिश मिडीयम शाळा