| पनवेल । वार्ताहर ।
माधवबाग ही हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार करणारी भारतातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था आहे. सुमारे पाच दशके लाखो हृदयरूग्णांवर यशस्वी उपचार करत आहे. माधवबागचे जाळे संपूर्ण देशात पसरले आहे. पूर्वी माधवबागमध्ये उपचार करून घेण्यासाठी रुग्णांना नवीन पनवेल बाहेर जावे लागत असे परंतु आता नवीन पनवेलकरांच्या सेवेमध्ये शिल्पा चंदने आणि डॉ.सुनिता पाटील यांच्या माध्यमातून सिनेराज टॉकीजच्या समोर आणि नायर आय केअर हॉस्पिटलच्या शेजारी नवीन पनवेल येथे माधवबाग नवीन पनवेल शाखेचे उद्घाटन अभिनेते सयाजी शिंदे आणि पमपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी नवीन पनवेलकरांसाठी त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी भविष्यात उद्भवणार्या हृदय रोगावर विना शस्त्रक्रिया उपचार करण्यासाठी आम्ही रुग्णांना प्रोत्साहित करणार आहोत जेणेकरून हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जे सध्या वाढत आहे ते आटोक्यात आणण्यासाठी आमच्या माधवबाग नवीन पनवेल तर्फे रुग्णांना योग्य ती सेवा मिळेल असे शिल्पा सचिन चंदने आणि डॉ.सुनिता पाटील यांनी सांगितले.