गीतेंचे गोगावलेंना थेट आव्हान
| पोलादपूर | प्रतिनिधी |
आता कितीही कोणी दावे प्रतिदावे करा. हे औटघटकेचे सरकार लवकरच कोसळणार आणि महाड विधानसभेचा पुढचा आमदार हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असणार, असा दावा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी लोहारे येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विभागीय जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी केला. यावेळी संजय कदम, अनिल नवगणे, अमित मोरे, बंटी पोटफोडे, अनिल मालुसरे, सतीश शेलार, घोसाळकर, बाळ राऊळ, मुरलीधर दरेकर, अनिल नलावडे, ज्ञानेश्वर बांदल, हरिश्चंद्र साळुंखे, किसन पारकर, संभाजीदादा साळुंखे, अश्विनी गांधी, निलेश सुतार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अनंत गीते यांनी, ज्यांना गद्दारी जमली ते शिवसैनिक कसले, असा सवाल करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्हयामध्ये पहिले तीन आमदार गद्दार निपजले याची चीड आणि लाज संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांना वाटत असल्याचा खेद व्यक्त केला.