| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या 20 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचे गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची बिले न भरल्यामुळे कोट्यावधीची बाकी आह. ग्रामपंचायतीकडे एमआयडीसीची जानेवारी अखेर पाणी बिलाची 26 कोटी 70 लाख 58 हजार 322 रुपये इतकी थकबाकी बाकी आहे. यामध्ये आर्थिक दृष्ट्या सधन समजल्या जाणार्या जेएनपीटी आणि ओ.एन.जी.सी. हद्दीतील ग्रामपंचायती आघाडीवर आहेत.
तालुक्यातील भेंडखळ, बोकडवीरा, जासई, तेलीपाडा व बालई या पाच गावांनी एमआयडीसीचे पाणी देयेके भरली आहेत. ग्रामपंचायतीकडून नागरिकांकडून नित्य नियमाने पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र एमआयडीसीला पाण्याचे बिल भरण्यामध्ये टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या ग्रामपंचायतींकडे कोट्यावधीची थकबाकी साठली आहे. या ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्यास त्यांची मीटर नादुरुस्ती दंड, मंजूर कोटा दंड, मिटर भाडे आणि विलंब शुल्क माफ करण्याचे एमआयडीसी ने जाहीर केले आहे. नुकतेच ग्रामपंचायतीने आपल्या पाण्याचे बील भरले असता, त्यांची 1 कोटी 65 लाख रुपये दंड विलंब शुल्क, मीटर नादुरुस्त दंड आदींचे माप केले असल्यामुळे ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केले आहे. उरण तालुक्यात ओद्येगीक क्षेत्र आणि वीस ग्रामपंचायतींना एमआयडीसी कडून रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणी पुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या काही ग्रामपंचायती वगळता ग्रामपंचायतीकडून दाखविली जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.