श्री जातमाता देवीची भव्य मिरवणूक
| महाड । प्रतिनिधी |
महाड आणि पोलादपूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव गेल्या दोन दिवसापासून पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे. या उत्सवामध्ये महाशिवरात्रीचा दिवस महत्त्वाचा समजला जातो, यानिमित्त ग्रामदेवी श्री जाकमाता देवीची सवाद्य पालखी मिरवणूक आणण्यात आली. शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये अनेक आखाडे चित्ररथासह सहभागी झाल्याने संपूर्ण महाड शहर भक्तीमय झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त शिनिवारी पहाटेपासून श्री वीरेश्वर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
श्री वीरेश्वर महाराजचा उत्सव सुरू होऊन दोन दिवस झाले, पहिल्या दिवशी गादी पूजन, जल पूजन, आणि सर्व देवताना साकडं घालून उत्सवची सुरुवात करण्यात आली. रात्री धनंजय गद्रे महाराजचे कीर्तन होऊन पहिल्या दिवसची सांगता झाली. दुसरा दिवस दुपारी सरपंच दीपक वारंगे आणि विध्यमांन माजी सरपंच दिलीप पार्टे ह्यांनी प्रसार माध्यम मधून उत्सव कसा साजरा होणार आणि शासन च्या सूचना चे पालन कसे करणार हे थोडक्यात सांगितले, रात्री कीर्तन होऊन दुसर्या दिवसची सांगता झाली.
शनिवार तिसरा दिवस म्हणजे महाशिवरात्री श्री वीरेश्वर महाराज आपल्या लाडक्या बहिणीला म्हणजे गावदेवी (जाकमाता ) देवीला वाजत गाजत आपल्या आणण्यासाठी माघारी श्री विरेश्वर पंच कमिटी, सेवेकरी आणि भक्त जाऊन देवीच्या पालखी समोर पायघड्या घालून आणले अशी पूर्वपार प्रथा असून तिचे ग्रामस्थांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. त्यामध्ये महाडमधील तांबड भुवन आणि नवी पेठेचा नगारा, शहरातील सर्व भागातील सासन काठी, खालू बाजा,आणि आखाडे सहभागी झाले, महिला भगिनीची आई गावदेवीची खणा ओटी भरीत होत्या. कारण जाकमाता देवी वर्षातून एक दिवसच आपल्या दारावरून जाणार त्याचा आनंद महिला भगिनींच्या चेहर्यावर दिसत होता. पालखीसाठी पायघड्या टाकण्याची संधी प्रत्येक महिला न चुकता घेताना दिसत होत्या.
श्री जाकमातादेवी कोटेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये स्थानापन्न झाल्यावर कीर्तन सुरू असते. तेव्हा श्री वीरेश्वर महाराजच्या पिंडी भोवती पूजा मांडली जाते. महापूजेचा मान पोतनीस घराण्याकडे असल्याने त्यांचे वंशज बिपिन पोतनीस यांना दिला जातो. या पूजेमध्ये देवस्थानचे प्रमुख विश्वस्त व अन्य विश्वस्त सहभागी झाले होते आणि या महापूजेनंतर महाशिवरात्रीची सांगता करण्यात आली.