| महाड | प्रतिनिधी |
बिरवाडीनजीक काळीज गावातील इसमाचा एका चार मजली इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेंद्र मधुकर महामुनकर यांच्या मालकीच्या साई स्वरूप कॉम्प्लेक्स येथे भाड्याने राहणारा राजेश अफसरसिंग यादव (उत्तर प्रदेश) याचा दारूच्या नशेमध्ये चौथ्या मजल्यावरून तोल गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे. महाड पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. .






