| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
एकदरा गावासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत एकदरा ग्रामपंचायतीसाठी एक कोटी 44 लाख रुपये खर्च करून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे भूमिपूजन माजी आ. पंडित पाटील व जिल्हा सह चिटणीस मनोज भगत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना पंडितशेठ पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली आहे.
यावेळी तालुका चिटणीस अजित कासार, माजी सभापती चंद्रकांत कमाने, हनुमान मच्छिमार संस्थेचे चेअरमन पांडुरंग आगरकर, पाणी पुरवठा समिती उपाध्यक्ष ललित मढवी, माया वाघरे, रोहन निशानदार, हरिचंद्र आगरकर, अरुण मढवी, मंगल झुजे, गिरीश झुजे, उद्देश गंबास, हेमंत गंबास, महादेव वेटकोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंडित पाटील यांचा एकदरा ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी श्रीराम मंदिरच्या नूतनीकरणसाठी आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीमधून लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले. एकदरा गावामध्ये सर्वाधिक लोक शेकापला मानणारी आहेत. त्यामुळे विकास कामांमध्ये या गावाला नेहमी अग्रक्रम दिला जातो. समाजात जो पर्यंत श्रीमंत व गरीब अशी दरी राहणार तो पर्यंत शेकापचे अस्तित्व राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सह चिटणीस मनोज भगत व तालुका चिटणीस अजित कासार यांची भाषणे सुद्धा झाली. सदरील कार्यक्रमासाठी असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.