| खांब-रोहा | वार्ताहर |
माजी आ.बाळाराम पाटील यांनी रोहा तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंन्टर व अन्य शैक्षणिक साहित्याची भेट देऊन आपली वचनपूर्ती केली आहे. साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव हायस्कूल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात माध्यमिक शाळांना प्रिंन्टरची भेट देण्यात आली आहे.शेकाप नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे प्रिंटरचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी मेढा हायस्कूलचे चेअरमन लक्ष्मण महाले,मेहंदळे स्कूलचे प्राचार्य विनय मोसे तसेच रोहा तालुका पुरोगामी शिक्षक संघटना अध्यक्ष नारायण पानसरे,सचिव विनय मार्गे आदींसह तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.