| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवार (दि.4) दु.1 ते 4 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकरी व मजूर वर्गाच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्या कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्थेच्या वतीने सदरील शिबिराचे आयोजन सोनगाव येथील सोमेश्वर मंदिर येथे करण्यात आले असून, या शिबिरात रोह्यातील श्री पॅथॉलॉजी यांच्या सहयोगाने पुणे येथील तज्ज्ञ डॉ. तुषार राजपूत आणि त्यांची टीम ब्लड प्रेशर, शुगर, हिमोग्लोबिन, अस्थमा, सांध्यांचे आजार, पोटांचे विकार, कंबरदुखी, म्हातारपणातील आजार, लहान मुलांचे आजार आदी आजारांबाबत तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे.
यावेळी आहाराबाबत योग्य-अयोग्य सवयी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तर शिबिराचे यशस्वीतेसाठी कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्था व सोनगाव येथील तरूण मंडळाचे सदस्य मेहनत घेत आहेत.




