कुर्डूस, कर्नाळा स्पोर्टस विजेते
| पेझाारी | वार्ताहर |
विनायक क्रीडा मंडळ दिवलांग कबड्डी संघाची माजी खेळाडू व रायगड जिल्हा कबड्डी संघाची संघ व्यवस्थापक कै. नीता दिलीप धुमाळ हिच्या स्मरणार्थ राष्ट्रीय खेळाडू दिलीप धुमाळ, सदानंद धुमाळ, अरविंद धुमाळ व कुटुंबिय विनायक संघाचे खेळाडू यांनी पुरूष व महिला असे 16/16 संघाचे एक दिवशीय सामने आयोजित केले होते. या झालेल्या भव्य दिव्य पुरूष कबड्डी स्पर्धेत मातृछाया कूर्डूस संघाने जय हनुमान संघ-चरी (अलिबाग) या संघाचा पराभूत करून अंतिम विजेतेपद पटकाविले. तर नवयुवक खिडकी, म्हसोबा पेझारी या संघाना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामध्ये उत्कृष्ट चढाई- मितेश पाटील (म्हसोबा पेझारी), सर्वोकृष्ट खेळाडू- अदनान औसेकर (कुर्डूस-अलिबाग), उत्कृष्ट पकड- ॠतूराज पाटील (चरी) यांना गौरविण्यात आले.
महिलांच्या झालेल्या अटितटीच्या सामन्यांमध्ये कर्नाळा स्पोर्टस पनवेल या संघाने टाकादेवी मांडवा (अलिबाग) या संघावर मात करून अंतिम विजय मिळविला तर किहीम, श्रीगणेश दिवलांग यांना 3व 4 क्रमांक विभागून देण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट खेळाडू रश्मी पाटील (पनवेल), उत्कृष्ट चढाई- प्रिती पाटील (दिवलांग), उत्कृष्ट पक्कड- निमिषा म्हात्रे (टाकादेवी-मांडवा) यांना गौरविण्यात आले.
सदर सामन्यांकरीता आयोजकांनी रोख रक्कम, चषक, सन्मानचिन्ह, आदी बक्षिसे देऊन विजेत्यांचा गौरव केला. सदरचे बक्षिस वितरण जि.प.चे माजी उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, दिलीप धुमाळ, अमरनाथ पाटील आदि मान्यवरांचे उपस्थितीत वितरण करण्यांत आले. स्पर्धेचे समालोचन रविंद्र पाटील, सुशिल पाटील, सुनिल पाटील, यांनी केले. दर या संपूर्ण स्पर्धेचे व्यस्थापन दर्शन दिलीप धुमाळ यांनी पार पाडले तर स्पर्धेच्या पंचाचे सचिन पाटील, अच्युत पाटील यांनी केले. ही स्पर्धा कुठलीही संघाकडून फी व कुणाकडून देगणी न स्वीकारता आयोजित केली होती. या स्पर्धेत जिल्ह्यांतील मातब्बर पुरूष संघानी व महिला संघाचा सहभाग घेतला होता.
कबड्डीचे मोठे योगदान
रायगड जिल्ह्याच्या लाल मातीतला तरूणांचा रांगडा मैदानी कबड्डी खेळ कबड्डी महर्षी बुवा साळवी-प्रभाकर पाटील यांनी ऑलिपिंक पर्यंत नेण्याचा स्वप्न पाहिले होते व या कबड्डी खेळामुळेच इथल्या अनेक तरूण खेळाडूंना सरकार दरबारी तसेच पोलीस दल, रेल्वे, आर.सी.एफ. व विविध कंपन्यांमध्ये नोकर्या मिळाल्या. त्यामुळे कबड्डीला त्यांचे मोठे योगदान आहे असे गौरवोद्गार माजी आ.पंडित यांनी दिवलांग येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काढले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, जि.प.माजी सदस्या चित्रा पाटील, अॅड. मनोज धुमाळ, अॅड. नंदन पाटील, गजानन पाटील, अंबरनाथ पाटील, महेश पाटील, विश्वनाथ पाटील, दिलीप धुमाळ, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनंत पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.