| नवी मुंबई | वार्ताहर ।
पाच मिनिटांच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याचा प्रकार कोपरखैरणे येथे घडला आहे. यात एका 71 वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील आणि एका 35 वर्षीय महिलेच्या गळ्यातील असे एकूण 130 ग्रॅम सोन्याची चोरी झाली आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपीचे वर्णन मिळते जुळते असल्याने आरोपी एकच असल्याची शंका पोलिसांनी आहे. या दोन्ही प्रकरणात मिळून तीन लाख 90 हजार रुपये किमतीच्या 130 ग्रॅम सोन्याच्या दोन साखळी चोरी झाल्या आहरेत. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.