। वाघ्रण । दीपक पाटील ।
रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत काम करणारे नेतृत्व म्हणजे चित्रलेखा पाटील. शेकापच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकाराने आजपर्यंत विविध समाजोपयोगी कार्य केले आहे. त्यांचे कार्य तळागाळात पोहचले असल्याचे प्रतिपादन माजी आ. पंडीत पाटील यांनी केले. अलिबाग तालुक्यातील खिडकी येथे बुधवारी (दि.26) सकाळी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते व्ही. के पाटील, सिताराम पाटील, प्रमोद ठाकूर, पी.के. पाटील, जयराम ठाकूर, डॉ. प्रमोद खानावकर, डॉ. प्रियांका गायकवाड, नेत्र चिकीत्सक साहील म्हात्रे, अक्षय गोरे, समुपदेशक शाशिकात शियाते, चेतन राठोड, वाहन चालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना पंडीत पाटील म्हणाले की, चित्रलेखा पाटील यांनी मोफत सायकल वाटप आणि कोव्हिड काळात मदतीचा हात देण्याचे पवित्र काम केले आहे. या जिल्ह्यात स्व. प्रभाकर पाटील, अॅड.दत्ता पाटील यांच्या कार्याप्रमाणेच पुढची पिढी वेगाने कार्य करीत आहेत. विधान परिषदेमध्ये शेतकर्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आ. जयंत पाटील आहेत. शेकाप कामे करतो ते कर्तव्य म्हणून. जनतेच्या सेवेची जाणीव म्हणून करीतो, असेही ते म्हणाले.
यावेळी खिडकीचे माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य म्हणून काम पाहिलेले कार्यकर्ते स्व.सुधीर आत्माराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील व भावना पाटील यांनी देखील विनम्र अभिवादन केले.
शेकापचे आभार
जिल्हा सामान्य रुग्णालय नेत्र विभाग आणि लक्ष्मी आय केअर सेंटर या टिमने शिबिरात सहकार्य केले. पंचक्रोषीतील नारायण वाघमारे, दीपाली गावंड, सरिता गावंड, शकुंतला म्हात्रे, विजय म्हात्रे, महेश गावंड, सदानंद गावंड, भालचंद्र पाटील, रामदास नाईक, विकास ठाकूर, मिनाक्षी पाटील, पार्वती सावळाराम पाटील, नितिन पाटील, लता पाटील, सविता पाटील, यशवंत पाटील, मुरली पाटील आदींनी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाबाबत शेकापचे आभार मानले.
अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी
चष्मे वाटप झालेल्या नागरीकांना विचारले असता त्यांनी चांगले, अनुभवी डॉक्टर तसेच चांगल्या दर्जाचे चष्मे तेही मोफत दिल्यामुळे समाधान व्यक्त केले. सुधीर पाटील यांच्या द्वीतीय स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने झालेल्या शिबीरात अनेकांनी सहकार्य केले. यामध्ये शेकाप कार्यकर्ते रुपेश पाटील, कै. सुधीर पाटील यांचे बंधू रजनीकांत पाटील, विनय पाटील, चेतन पाटील, दता नाईक इत्यादींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप पाटील यांनी केल