| माणगाव | वार्ताहर |
शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगाव यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बुधवार (दि.10) रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत वृत्तपत्र विक्रेते बाळकृष्ण मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅन्ड माणगाव याठिकाणी करण्यात आले आहे. सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरीब गरजू लोकांनी घ्यावा असे आवाहन माणगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय मेथा यांनी केले आहे.
सदरचे शिबीर हे दरमहिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या बुधवारी होत असते. गेली आठ महिन्यांपासून माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत 800 हुन अधिक मोतीबिंदू असणार्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेथा परिवारातर्फे विजय मेथा, मनीष मेथा, विधिता मेथा, सुप्रिया शिंदे यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल टीम विशेष परिश्रम घेत आहेत.