| सोगांव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील आदिवासीवाड्यांवर दी लाईफ फाऊंडेशनद्वारा आयोजित निःशुल्क समर कॅम्पच मापगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. या समर कॅम्पमध्ये आदिवासी तसेच गावातील इतर समाजाच्या मुलामुलींना सहभाग घेण्यास आवाहन केले आहे. या समर कॅम्पमध्ये मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच विविध खेळांच्या आणि हस्तकला, चित्रकला इत्यादींच्या माध्यामातून मूल्यशिक्षण, स्त्री-पुरूष समानता, संवादकौशल्य, समन्वय इत्यादी जीवन आवश्यक गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. हे समर कॅम्प रा.जि प.शाळा मापगांव येथे दि 8 ते 12 मे दरम्यान सकाळी 09 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. इच्छुक मुलामुलींनी सहभागी होण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते शिलानंद इंगळे – 9325054280, प्रणय ओव्हाळ, राखी राणे यांना संपर्क साधावा, असे आवाहन दी लाईफ फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.