| अलिबाग | वार्ताहर |
भाऊराया हॅन्डलूम सोलापूर हातमाग व यंत्रमाग कपड्याचे भव्य प्रदर्शन व विक्री सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल मुख्य पोस्ट ऑफिस समोर अलिबाग दिनांक 30 मे पर्यंत हा प्रदर्शन चालणार आहे. हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जेचे असते, त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शन अलिबागकरांनी लाभ घ्यावा, असे हातमाग कापडाचे प्रदर्शनचे प्रमुख योगेश पोतन यांनी केले आहे. या प्रदर्शन प्रसंगी पांडुरंग पोतन यांनी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कॉटन साड्या, इरकली साडी, मधुराई साडी, पटोला साडी, सेमी पैठणी, खाली कॉटन खाली सिल्क, पटोला ड्रेस मटेरियल, ड्रेस मटेरियल, टॉप पीस, खान साडी, सोलापूर चादर, डबल बेडशीट ,रजाई, पंचा, टॉवेल, सतरंजी, लुंगी, पिलोकावर, बंडी, पायजमा, कुर्ता, लेडीज गाऊन, लेडीज अँड बॅग असे विविध प्रकारचे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सूचित व खादी कापडाचे विक्रीवर 20 टक्के सूट ठेवण्यात आली आहे असे आयोजकांनी सांगितले आहे. ग्राहकांचे अग्रणानुसार हे प्रदर्शन 30 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे.