| पनवेल | वार्ताहर |
मुलांना खेळण्यासाठी तसेच आबाल वृध्दांना बसण्यासाठी खारघर मधील शिल्प चौक मध्ये उभारण्यात आलेल्या उद्यानाची दुरावस्था झाली आहे. या उद्यानात कचर्याचे ढीग पडलेले असुनही त्याकडे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर, सेक्टर- 20 येथील शिल्प चौक खारघरमधील मध्यवर्ती ठिकाण आहे. चारही बाजुने दुकाने तसेच निवासी वस्ती असल्यामुळे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी तसेच आबाल वृध्दांना बसण्यासाठी सिडकोफने येथे उद्यान उभारले आहे. खारघर वसाहतीचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यामुळे उद्यान आणि मैदानाची महापालिकेकडून देखरेख केली जाते. मात्र, सदर उद्यानात अनेक दिवसांपासून कचर्याचे ढीग पडून आहे. तसेच उन्हाळ्यात उद्यान विकसित करण्याचे काम सुरु होते. आजही अनेक ठिकाणी लाद्या पडलेल्या आहेत. तसेच खेळण्याच्या चोहोबाजूंनी पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष देवून उद्यानातील समस्या दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.