| पेण | प्रतिनिधी |
पेणसह रायगडमध्ये 17 जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या 10 वर्षातला पाऊस पडल्याचा उच्चांक पेण तालुक्याने गाठला आहे. पेण तालुक्यात एकूण 11 गावे दरडग्रस्त आहेत. त्यांना वेळ पडल्यास स्थलांतरीत करण्यासाठी पालक म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
यामध्ये नायब तहसिलदार नितीन परदेशी (दूरशेत, 9975576663), नायब तहसिलदार दादासाहेब सोनावणे (वरवणे, 8087565829, निवासी नायब तहसिलदार प्रसाद कालेकर (झापडी, बौध्दवाडी, शिन्दलेवाडी, धनगर वाडी, गागोदे बु ते हेटवणे 8308037954), गटविकास अधिकारी भाउसाहेब पोळ (खरोशी, 942028167), तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर (महल मिऱ्या डोंगर 9765810808), आरोग्य निरिक्षक नगरपालिका पेण शिवाजी चव्हाण (मुंगोशी 7276220710), विस्तार अधिकारी समिर सानप (जुई अब्बास खाणी 8149593960), विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे (देवळी 8805173661) या अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या असून दरडग्रस्त गावांमध्ये काही समस्या आल्यास अथवा नागरीकांना स्थलांतरीत करायचे असेल तर अधिकाऱ्यांना संपर्क करावा.
हे अधिकारी पालकतत्व दिलेल्या गावांच्या स्वतः संपर्कात असतील व तेथील परिस्थितीचा आढावा घेतील. नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही समस्या आल्यास या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी केले आहे.