| अलिबाग | प्रतिनीधी |
अलिबाग तालुक्यातील रामराज परिसराला पुराचा वेढा बसला आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने रामराज नदीला पूर आला आहे. रामराज गावाला संपर्क साधण्यासाठी असणाऱ्या पुलावरून पाणी जात असल्याने पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. यामुळे सकाळी अलिबाग किंवा रोहाकडे जाणाऱ्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आपले इच्छित स्थळी पोहचता आले नाही. पावसाचा जोर कायम राहिला तर रामराज आणि परिसरातील गावांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. उमटे धरण आणि प्रस्तावित सांबरकुंड धरणातील नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.







