वडखळ पोलिसांची कामगिरी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जेएसडब्लू कंपनीच्या पार्किंग मध्ये सिमेंटने भरलेला उभा ट्रक चोरट्याने पळवून नेला होता. वडखळ पोलिसांनी या चोरट्याला शिताफीने अवघ्या 15 तासात अटक करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे 04:00 च्या सुमारास जेएस डब्ल्यु कंपनी डोलवीच्या पार्किंगमध्ये उभा केलेला समर्थनगर, रामवाडी वडखळ यांचा सिमेंटने भरलेला ट्रक क्रमांक MH43-U7640 वाशी नाका ता. पेण येथील चोरट्याने याने चोरुन नेला होता. याबाबत तक्रार दाखल होताच अवघ्या 15 तासांत वडखळ पोलिसांची तपासाची चक्रे फिरवीत सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 18 ऑगस्ट 2021रोजी सांयकाळी 7. 31 च्या सुमारास म्हणजेच अवघ्या 15 तासातच अटक करण्यात यश मिळवले आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक म्हात्रे हे करीत आहेत