उरण | वार्ताहर |
उरणचे सुपुत्र पोलीस अधिकारी अमित सदानंद शेलार यांची बदली नवी मुंबईमधून थेट दहशतवादीविरोधी पथक, मुंबई (अढड) महाराष्ट्र येथे स्पेशल फोर्समध्ये झाली आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अमित शेलार यांनी उरण पोलीस ठाणे, कामोठे पोलीस ठाणे, रबाळे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम केले. तसेच अँटी नार्कोटिक्स विभाग, क्राईम ब्रँच, सेंट्रल युनिट आदी विभागातदेखील काम केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आजपर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांना अनेकवेळा शासनाने तसेच विविध संस्था, संघटनांनी गौरविले आहे. त्यांची नियुक्ती दहशतवादी विरोधी पथक मुंबईच्या स्पेशल फोर्समध्ये झाल्याने सर्व स्तरातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.