| वेनगाव | वार्ताहर |
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये कर्जतची सोनिया शैलेश खोब्रागडे हिने सुवर्णपदक पटकाविले आहे. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडी, ता.कर्जतच्यावतीने तिचे अभिनंदन करून झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी ॲड. कैलास मोरे, धर्मेद्र मोरे, अनिल गवले, सुनील गायकवाड, सुनील सोनावणे, लोकेश यादव, संतोष जाधव, अशोक कदम, तालुका कोषाध्यक्ष राजू ढोले,इत्यादी उपस्थित होते…
पुणे (खराडी), येथे राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा पार पडली , या स्पर्धेत राज्यातील एकूण 1400 स्पर्धेकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र चे अध्यक्ष निलेश शेलार यांनी केले होते. या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील 6 तर रायगडातील एकूण 70 स्पर्धाकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सोनिया शैलेश खोब्रागडे हिने तिच्या वजनी गटामध्ये पॉईंट फाईट आणि लाईट कॉन्टॅक्ट या दोन्ही प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकवले आहे. सोनिया ही कर्जत एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मिडीयम स्कूल, अमराई येथे शिकत असून कराटे आणि किकबॉक्सिंग चे प्रशिक्षण वडील शैलेश खोब्रागडे यांच्याकडे घेत आहे.