अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ पोयनाडतर्फे जमुनानगर, पोयनाड येथे वृक्षारोपण करण्यात आले. लायन्स क्लब पोयनाड या संस्थेच्या सामाजिक कार्याने तिच्यावर पोयनाड विभागातूनच नव्हे तर, जिल्ह्यातूनही नेहमी कौतुकाचा वर्षाव होत असतो. यावेळी लायन्स क्लब ऑफ पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष विनोद पाटील, सेक्रेटरी प्रगती सिनकर, नोडल ऑफिसर जीएमपी रायगड प्रदीप सिनकर, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन मनीष अग्रवाल, अरविंद अग्रवाल, संतोष पाटील, दिलीप गाटे, दीपक गाटे, प्राजक्ता गाटे, ललित जैन आदी सभासदांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण उपक्रम पार पडला. याप्रसंगी 150 रोपे लावण्यात आली.