| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीमध्ये रासायनिक पाणी सोडल्यामुळे नावडा येथील शेतकऱ्याच्या 8 बकऱ्या दगावल्या आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी दिली आहे.
नावडे गावातील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याच्या या बकऱ्या होत्या.कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे हे न्यायालयीन लढा लढत आहेत. प्रदूषणाबाबत आठ जुलै रोजी त्यांनी ईमेल केले होते, जर योग्य कारवाई झाली असती तर शेतकऱ्याच्या बकऱ्या मरण पावल्या नसत्या, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कासाडी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला तरी चालेल मी मागे हटणार नाही, असा इशाराही माजी नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी दिला आहे.