| खोपोली | प्रतिनिधी|
स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.आ.महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अर्चना सुळ-नारनवर, पंकज पाटील, कुलदीपक शेंडे,राजू गायकवाड, सुवर्णा मोरे, केविना गायकवाड, प्रिया जाधव, बाबू पोटे, संदेश पाटील, तात्या रिठे, सुरेखा खेडकर,जेसेल निलेश पाटील, सारिका सावंत, राजेंद्र मांडे यांसह घरकाम करणाऱ्या महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश मराजगे यांनी केले.